हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश

कायदेशीर मार्गानं हाजीअली दर्ग्यात प्रवेश मिळवल्यानंतर आता महिलांचा विश्वास वाढलाय. त्यामुळे आता, मशिद आणि कब्रस्तानातही महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी काही महिला प्रयत्न करतायत.  

Updated: Dec 22, 2016, 05:45 PM IST
हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश title=

मुंबई : कायदेशीर मार्गानं हाजीअली दर्ग्यात प्रवेश मिळवल्यानंतर आता महिलांचा विश्वास वाढलाय. त्यामुळे आता, मशिद आणि कब्रस्तानातही महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी काही महिला प्रयत्न करतायत.  

'हाजीआली' दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळाल्यानंतर 'इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी' या संस्थेनं महिलांना कब्रस्तान, मशिदीत मुक्त प्रवेश मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतलीय.

फक्त महिलांचीच नसबंदी का?

मुस्लीम समाजात नसबंदी फक्त महिलांची केली जाते हे चुकीचं असून पुरूषांनाही ती लागू करावी, अशी मागणी या संस्थेने केली. भविष्यात महिलांमध्ये जनजागृती केली जाईल, असं संस्थेचे प्रमुख जावेद आनंद यांनी सांगितलं.