आदर्श घोटाळा- कोर्टाने सीबीआयला झापलं

आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Updated: Mar 12, 2012, 10:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सबळ पुरावे असताना आरोपींना अटक का करत नाही, तुम्ही कोणाची वाट पाहत आहता.? असा सवालच न्यायालयाने केला आहे.  अंमलबजावणी संचानालयाकडून तपासाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

 

सीबीआयने बोगस नावाने सोसायटी प्लॅट घेतलेल्या आठ जणांची यादी न्यायालयाला सादर केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली.

 

 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे घरकुल घोटाळ्या संदर्भात विचारलं असता म्हणाले की मला कधीच माहिती नव्हती. तसंच सेना कोणत्याही गुन्हेगारास पाठीशी घालणार नाही. हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे का ते पाहावं लागेल. माझ्या अंदाजाने या मागे निश्चितच राजकारण आहे. नाशिक महापालिकेच्या संदर्भात १५ तारीख येऊ दे मग त्यावर बोलेन.

 

दरम्यान कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कालच त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज  केली.

 

 

मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी  माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली होती. हीच बाब काँग्रेसची मोठी डोकेदुखी ठरली होती. आदर्श घोटाळा प्रकरणात गिडवाणी यांना काँग्रेसने अभय दिले होते. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, त्यांना अटक झाल्याने काँग्रेसची अब्रु चव्हाट्यावर आली.

 

 

आदर्श घोटाळ्यातील आपल्यावरील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांची लाच दिल्याची धक्कादायक माहिती सीबीआयला याप्रकरणाच्या तपासात मिळाली. गिडवाणी पिता पुत्रांबरोबर सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी आणि जे. के. जिग्यासी यांना सीबीआयने याप्रकरणी अटक केली.  आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात अडकलेले गिडवाणी या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत. आदर्श सोसायटीच्या निर्मितीपासूनच गिडवाणी या सोसायटीचे प्रमुक सदस्य होते.  जिग्यासी वकीलामार्फत २१ लाख रूपये दिले होते.

 

 

दरम्यान,  मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला.  आता लाचप्रकणी चौघांना अटक करण्यात आल्याने नवे गौलबंगाल पुढे आले आहे.