काँग्रेस, भाजप देणार नगरसेवकांना ट्रेनिंग

निवडणुकांपूर्वी जरी परीक्षा दिल्या नसल्या तरी आता काँग्रेस, भाजपच्या नव्या नगरसेवकांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण या दोन्ही पक्षांनी नव्या नगरसेवकांना ट्रेनिंग देण्याचं ठरवलय. २१ हजार कोटी बजेट असलेल्या मुंबई मनपात कारभार कसा करावा, हे यात शिकवलं जाणार आहे.

Updated: Feb 22, 2012, 03:11 PM IST

www.24taas.com,  मुंबई

निवडणुकांपूर्वी जरी परीक्षा दिल्या नसल्या तरी आता काँग्रेस, भाजपच्या नव्या नगरसेवकांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण या दोन्ही पक्षांनी नव्या नगरसेवकांना ट्रेनिंग देण्याचं ठरवलय. २१ हजार कोटी बजेट असलेल्या मुंबई मनपात कारभार कसा करावा, हे यात शिकवलं जाणार आहे.

राजश्री शिरवाडकर मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक १६७ मधून भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्यात. पहिल्यांदाच त्यांना नगरसेवकपदाची संधी मिळालीय. आता निवडणुकांच्या धामधुमीत यश मिळवल्यानंतर, आता त्यांची लगबग सुरु झालीय ती ट्रेनिंगची. भाजपतर्फे नव्या नगरसेवकांना मनपा कामकाजाबाबत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. दुसरीकडं काँग्रेसही विरोधी बाकांवर बसण्यासाठी नगरसेवकांना ट्रेनिंग देणार आहे. काँग्रेस, भाजपच्या नव्या नगरसेवकांनाही हे ट्रेनिंग उपयुक्त ठरणार आहे.

हजार कोटींचं बजेट असणा-या महापालिकेच्या कामकाजाची ओळख व्हावी, जनतेचे प्रश्न सभागृहात कसे मांडावेत.. यासारख्या महत्त्वाच्या बाबींचं ट्रेनिंग या नगरसेकांना दिलं जाणार आहे. प्रत्यक्ष वॉर्डातल्या समस्या, जनसंपर्क, मनपा सभागृहातली कामगिरी अशा अनेक आघाड्यांवर या नव्या नगरसेवकांची कसोटी लागणार आहे.