www.24taas.com, मुंबई
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरू केला आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे सांगून कृपाशंकर सिंहानी हात झटकले आहेत. दरम्यान, अज्ञातवासात असलेले कृपाशंकर सिंह मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.संपर्काबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे
दोन दिवसांपासून अज्ञातवसात असलेले कृपाशंकर मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिल्याने ते अडचणीत येऊ शकतात, अशी अटकळ आहे. मात्र कृपाशंकर सिंह अद्याप मीडियासमोर येण्यास तयार नाही. कृपांना काँग्रेसने पाठिशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, कोर्टाचा आदेश असताना त्यांना का अटक होत नाही, असा सवाल विचारण्यात येत आहे. मुख्यंमत्री पृथ्वीराज चब्हाण यांच्या संपर्कात असलेले कृपा पोलिसांना का सापडत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मी निर्दोष आहे - कृपा
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेले कृपाशंकर सिंह यांनी खुलासा केलाय. मी निर्दोष आहे आणि न्यायालयात लढाई लढणार असं त्यांनी सांगितल आहे. आपल्याला आणि कुटुंबाला मीडियाकडून टार्गेट केलं जातयं असंही कृपाशंकर यांनी म्हंटल आहे.. मुलानं मीडियासोबत केलेल्या मुजोरीबद्दल त्यांनी माफी मागितलीय. विशेष म्हणजे छापासत्रानंतर अज्ञातवासात गेलेल्या कृपांनी मी पळून गेलेलो नाही असा खुलासा केलाय मात्र आपण कुठे आहोत हे स्पष्ट केलेलं नाही.
कृपांच्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी ?
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत सापडलेले कृपाशंकर सिंह यांना सुप्रीम कोर्टातही दिलासा मिळू शकलेला नाही. हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्यावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणा-या कृपाशंकर यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास कोर्टानं नकार दिलाय. कृपा यांच्या वकिलांनी शुक्रवारीच या याचिकेवर सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं तातडीनं या प्रकरणावर सुनावणीस नकार दिलाय. सुप्रीम कोर्टाला होळीची सुट्टी असल्यानं आता कृपांच्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर यांच्याविरोधात सुरु झालेली कारवाई पाहता दरम्यानच्या काळात कृपांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
मुजोर नरेंद्रमोहन
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अडचणीत सापडलेले कृपाशंकर सिंह यांचे पुत्र नरेंद्र मोहन यांनी आपल्या मुजोरीप्रकरणी मीडियाची माफी मागितलीय. मात्र, शुक्रवारी कृपाशंकर सिंहांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश देऊनही त्यांच्या कुटुंबियांचा माज कायम असल्याचं दिसून आला आहे. कृपाशंकर सिहांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह यानं चक्क मीडियाला बोट दाखवत वाईट इशारे केले होते. तरंग बंगल्याच्या आतमधून नरेंद्र मोहन यानं हे कृत्य केलं होतो. दरम्यान, कृपाशंकर सिंह यांची BMW गाडीही जप्त करण्यात आलीय. ४० कोटी रुपये किमतीचा तरंग बंगला, फ्लॅट्स आणि आता BMW गाडीही जप्त करण्यात आलीय.
पाठिराखे गृहमंत्री
गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केलीये. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटल आहे. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितल आहे.