www.24taas.com,मुंबई
मुंबई महापालिकेसाठी महायुतीची घोषणा काही वेळात होणार असली तरी आरपीआयचे नेते रामदास आठवले अजूनही नाराज आहेत. ३० ऐवजी २९ जागांवर समाधान मानल्यानंतर आता काही विशिष्ट वॉर्डासाठी आग्रह धरून त्यांनी दबावतंत्र निर्माण करण्याची खेळी खेळली आहे.
मुंबई महापालिकेसाठी महायुतीवर शिक्कामोर्तब झाला असून शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाइं २९ असा फॉम्युला घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार आहे. या संदर्भात काही वेळातच घोषणा होण्याची शक्यता आहे.
आज रामदास आठवले यांच्या संविधान या बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला भाजप-सेना आणि रिपाइंचे नेते बैठक करत असून ठरलेल्या यादीवर चर्चा सुरू आहे.
रामदास आठवले कालपर्यंत ३० जागांवर अडून बसले होते. परंतु, त्यांनी २९ जागांवर समाधान मानले. आता त्यांना वरळी, मुलुंड आणि विक्रोळी येथील जागा हव्या आहे. त्यासाठी त्यांनी दबाव टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. आठवले यांना सहार एअरपोर्ट, मुलुंड कॉलनी, कन्नमवार नगर, सिद्धार्थ कॉलनी आणि वरळी बीडीडी चाळ यासाठी आठवले यासाठी आग्रही आहेत.