लष्कराच्या जमिनीवर कल्पतरूचं 'पार्किंग' !

कांदिवली येथील ‘कल्पतरू बिल्डर्स ‌लँड’ घोटाळा प्रकरणी मंगळवारी लोकायुक्तांपुढे सुनावणी झाली. कांदिवलीमधील कल्पतरू बिल्डर्सनं लष्कराच्या जमिनीचा वापर पार्किंगसाठी केल्याचा आरोप असून मूळ राज्यसरकारची असलेली ही जमीन डिफेन्सला लीझवर देण्यात आली होती.

Updated: Jan 18, 2012, 08:33 AM IST

www.24taas.com, मुंबई

कांदिवली येथील ‘कल्पतरू बिल्डर्स ‌लँड’ घोटाळा प्रकरणी मंगळवारी लोकायुक्तांपुढे सुनावणी झाली. कांदिवलीमधील कल्पतरू बिल्डर्सनं लष्कराच्या  जमिनीचा वापर पार्किंगसाठी केल्याचा आरोप असून मूळ राज्यसरकारची असलेली ही जमीन डिफेन्सला लीझवर देण्यात आली होती.

मात्र डिफेन्स आणि राज्यसरकारच्या अधिकाऱ्याच्या संगनमतानं ही जमीन कल्पतरू बिल्डर्सना देण्यात आली होती. मंगळवारी महसुलखात्याचे अधिकारी आणि किरिट सोमय्या यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत लोकायुक्त पुरुषोत्तम गायकवाड यांनी तक्रारदार सोमय्या आणि अधिकाऱ्याची बाजू ऐकून घेतली. लोकायुक्तांकडे तपासाची यंत्रणा नसल्यामुळे ही केस अँटीकरप्शन ब्युरोकडे द्यावी अशी विनंती सोमय्या यांनी केली.

दरम्यान या जमीन घोटाळ्याचा तपास CBI कडे असून लोकायुक्तांपुढे पुढील सुनावणी १८ एप्रिलला होणार आहे.