www.24taas.com, मुंबई
दुष्काळावरुन विधानपरिषदेत आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी उडाली. सरकार दुष्काळाबाबत खोटी माहिती देत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम दिशाभूल करीत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. यावेळी दुष्काळी भागात चारा पोहचत नसल्याचं विरोधक आमदारांनी सांगत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. विरोधकांनी या मुद्यावर गोंधळ घातला. त्यामुळं विधान परिषदेचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झालं. बुधवारी राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय.