'जय... बजरंग बली'

पंजाबमधील एका जाट कुटुंबात जन्मलेल्या दारा सिंग यांनी भारतीय कुस्तीला जागतिक कुस्ती क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. याचबरोबर चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला एक आगळा ठसा उमवटवला. दारा सिंग यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले.

Updated: Jul 12, 2012, 10:30 AM IST

www.24taas.com

 

 

पंजाबमधील एका जाट कुटुंबात जन्मलेल्या दारा सिंग यांनी भारतीय कुस्तीला जागतिक कुस्ती क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. याचबरोबर चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला एक आगळा ठसा उमवटवला.  दारा सिंग यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले.

 

भारतीय कुस्तीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता आणि ग्लॅमर प्राप्त करून दिल ते दारा सिंग यांनी... १९ नोव्हेंबर १९२८ साली अमृतसरच्या धरमोचकमध्ये एका जाट कुटुंबात दारासिंगचा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच दारा सिंग यांना कुस्तीची आवड होती. अर्थातच या आवडीमुळे दारासिंग यांची पावल आपसूकच कुस्तीच्या आखाड्याकडे वळली. याच दरम्यान त्यांनी जत्रांमध्ये आपल्या कुस्तीची चुणूक दाखवायला सुरूवात केली. यानंतर व्यावसायिक कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांच्यातील गुणवत्तेच दर्शन घडायला लागलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक दिग्गज पैलवानांना आसमान दाखवले.

 

१९५४मध्ये दारा सिंग इंडियन चॅम्पियन बनले तर १९५९मध्ये कॉमवेल्थच चॅम्पियनशिपचं विजेतपद त्यांनी पटकावलं. १९६८ मध्ये अमेरिकेच्या लॉ थेझला पराभूत करत त्यांनी ‘चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड’चा किताब पटकावला. तर १९७८मध्ये ‘रूस्तम-ए-हिंद’ झाले. याचबरोबर त्यांना  ‘हॉल ऑफ फेम’चा सन्मानदेखील त्यांनी प्राप्त केला.  किंग काँग, जॉर्ज गॉरडेन्को,  माझीद आकरा, तारीक अली, प्रिन्स कुमाली, डेव्हिड टेलरसारख्या अनेक मल्लांना त्यांच्याच भूमित पराभूत करण्याची किमया दारा सिंग यांनी केली. १९८३मध्ये दारा सिंग यांनी कुस्तीमधून रिटायर्डमेंट जाहीर केली. आपल्या कुस्तीच्या कौशल्यामुळेच दारा सिंग यांना चित्रपट क्षेत्राच दार खुल झाल. रामायणात त्यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. कुस्ती आणि अभिनय आणि दिग्दर्शक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला.