सरकारमध्ये असे वाद होतातच- अजितदादा

ठाण्यातील कालच्या वादानंतर आघाडीत बिगाडी झाल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूर्ण विराम दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यांना महत्व न देता काम सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी पुण्यात स्पष्ट केलं आहे.

Updated: Apr 21, 2012, 10:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ठाण्यातील कालच्या वादानंतर आघाडीत बिगाडी झाल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूर्ण विराम दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यांना महत्व न देता काम सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी पुण्यात स्पष्ट केलं आहे. सरकारमध्ये असे वाद वारंवार होत असतात. मात्र त्यातून बाहेर पडून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

 

काही दिवसापूर्वीचं राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं होतं. राष्ट्रवादीनं काँग्रेस गृहीत धरू नये असा टोला त्यानंतर माणिकराव ठाकरेंनी लगावला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राज्यात जरी आघाडी असली तरी स्थानिक नेतृत्वात अजिबात सुसंवाद नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे.

 

त्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेसने गृहीत धरू नये. म्हणूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात नेहमीच सुंदोपसुंदी सुरू असते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने यापुढे तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आनंदाने नांदणार का?