अल्पवयीन तरूणीवर बलात्कार, बाप-आतेभाऊ अटकेत

नागपुरात सख्ख्या बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बापाच्या अत्याचारांना कंटाळून आतेभावाकडं आश्रयाला गेलेल्या या मुलीवर आतेभावानंही बलात्कार केला आहे.

Updated: Dec 28, 2012, 12:18 PM IST

www.24taas.com, नागपूर
नागपुरात सख्ख्या बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बापाच्या अत्याचारांना कंटाळून आतेभावाकडं आश्रयाला गेलेल्या या मुलीवर आतेभावानंही बलात्कार केला आहे. नागपूर मधील ह्या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
तब्बल दोन वर्ष पीडित मुलीवर तिचा बापच बलात्कार करीत होता. या लैगिंक त्रासाला कंटाळून तरूणी आपल्या आतेभावाकडे आश्रयास गेली. मात्र तरूणीच्या आतेभावानेही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे तरूणीची मानसिक स्थिती फारच वाईट झाली होती. तरूणीला मानसोपचार तज्ज्ञाच्या उपचारांचीही गरज लागली. आणि त्यातून बाहेर आल्यानंतर तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केल्याचे समजते.
य़ा अत्याचारामुळ हादरलेल्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघाही नराधमांना अटक करण्यात आली आहे. नागपुरातील गिट्टीखदान पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर बापाने आणि तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याने मुली आता घरातही सुरक्षित नाहीत असेच दिसून येते. वडील आणि आतेभावाकडून वारंवार बलात्कार होत असल्याने पीडित मुलीची मानसिक स्थितीही बिघडली होती. त्यानंतर तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपूर पोलिसांनी कारवाई करून नराधम पिता आणि आतेभावाला अटक केली आहे.