विकास भदाणे, www.24taas.com, जळगाव
मुंबई, पुण्यासह राज्यात डेंग्यूचा वेगानं फैलाव होतोय. आत्तापर्यंत 38 जणांचे बळी गेलेत. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात 10 जणांचा डेंग्यूच्या आजारानं मृत्यू झालाय. त्यामुळं सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासनापुढं डेंग्यूला रोखण्याचं आव्हान निर्माण झालंय.
एकट्या जळगाव जिल्ह्यात डेंग्यूमुळं 10 जणांचा बळी हा आकडा भीतीदायकच आहे. सरकारी पहाणीनुसार डेंग्यूसह तापाच्या साथीमुळे अत्तापर्यंत 20 जणांचा बळी गेलाय. यामुळं सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा परीषदेच्यावतीनं उपाययोजना सुरु करण्यात आल्यात. ग्रामीण भागात डेंग्यू पसरु नये म्हणुन आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातय.
जळगाव शहरातील पिंप्राळा, हुडको परिसरात डेंग्यूसदृश आजारानं 6 बालकांचा बळी गेलाय. दैनंदिन स्वच्छता पालिकेकडून होत नसल्याने साथीचे आजार बळावतायेत, असा आरोप नागरिक करतायेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात थैमान घालणा-या डेंग्यूचा इतरत्रही वेगानं फैलाव होतोय. सुस्त असलेल्या राज्याच्या आरोग्य विभागानं खडबडून जागं होण्याची गरज आहे.