www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद
उस्मानाबादमध्ये काळ्या जादूसाठी खोदकाम करण्याप्रकरणी बार्शीचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांच्या मुलासह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय.
राज्य सरकारनं जादूटोणाविरोधी कायदा केला असताना या प्रकरणात निवृत्त पोलीस निरीक्षकावरचं गुन्हा दाखल झालाय. उस्मानाबादच्या भूम तालुक्यात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. या टोळीला ग्रामस्थांनी रंगेहात पकडलंय.
हे टोळकं ज्या जीपमधून आलं होतं त्या जीपचीही ग्रामस्थांनी तोडफोड केली. ग्रामस्थांनी एकाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. घटनास्थळावरुन खोदकाम आणि पूजेचे साहित्य जप्त करण्यात आलंय.
कोण आहेत भाऊसाहेब आंधळकर यावर एक नजर टाकूया...
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे रहिवासी
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून केला राजकारणात प्रवेश
सोलापूर जिल्ह्यातले शिवसेना नेता म्हणून ओळख
पोलीस निरीक्षक म्हणून वादग्रस्त कारकीर्द
माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे सोबतचा वाद गाजला होता
अंधाळकरवर हक्कभंगाचा प्रस्तावही सभागृहात आणला होता
आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्याप्रकरणातही आले होते नाव
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.