ऑस्ट्रेलियन ओपन: सानियानं मिक्स्ड डबल्स गमावली

सानिया मिर्झा आणि तिचा रोमेनियन पार्टनर होरिया टेकाऊला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 26, 2014, 02:27 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मेलबर्न
सानिया मिर्झा आणि तिचा रोमेनियन पार्टनर होरिया टेकाऊला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
सानिया-टेकाऊ जोडीला फ्रेंच-कॅनेडियन जोडी असेलल्या क्रिस्टिना मालाडेनोव्हिच आणि डॅनियल नेस्टरनं ६-३, ६-२ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केलं. सहाव्या सीडेड सानिया-टेकाऊ जोडीचं या मॅचमध्ये काहीच चाललं नाही.
फायनलमध्ये सानिया-टेकाऊनं बाजी मारली असती तर सानियच्या टेनिस करिअरमधील हे तिसरं मिक्स्ड डबल्सचं विजेतेपद ठरलं असतं. त्याचप्रमाणे सानियाचं हे ऑस्ट्रेलियन ओपनचं दुसरं अजिंक्यपद ठरलं असतं. सानिया-भूपती जोडीनं २००९मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.