क्रिकेटर झालो नसतो तर.... - धोनी

भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लहानपणापासून क्रिकेटरच व्हायचं होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहात.

Updated: Oct 2, 2013, 07:27 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लहानपणापासून क्रिकेटरच व्हायचं होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहात.
नुकताच धोनीने रांचीला पॅराशूट रेजिमेंटसोबत एक दिवस व्यतीत केला. याप्रसंगी त्याने हे गुपित उघडं केलंय. महेंद्रसिंग धोनीला एका खास बाबीच आकर्षण होतं. या आकर्षणाचं कारणही तसंच खासंय!
आज क्रिकेट विश्वात इतक्या उंचीवर असलेला धोनी लहानपणापासून उंचीला घाबरायचा. किती विरोधाभास आहे ना ? याची कबुली खुद्द धोनीने रांचीला पॅराशूट रेजिमेंटसोबत एक दिवस व्यतीत केला त्याप्रसंगी दिलीय.
या भीतीतून सावरण्यासाठी त्याला भारतीय सैनिकांच्या रूबाबदार वर्दीची कायमच मदत झालीय. यावर्दीचं खास आकर्षण धोनीला होतं. ते इतकं की आताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी हा सैन्य दलात जाणार होता.
रांचीला पॅराशूट रेजिमेंटसोबत एक दिवस असतांना त्याने सांगितलं, की ही वर्दी खास आहे, यावर्दीला बघितल्यावर माझी भीती पळून जायची.
प्रेस कॉन्फ्रंन्सच्या आदल्या दिवशी फ्रिजमध्ये जाऊन बसतो असं सांगत कॅप्टन कूलने त्याच्या कूलनेसचं रहस्यही एका प्रश्नाच्या उत्तरात उघड केलं.
याप्रसंगी धोनीने सैनिकांच्या कुटुंबियासोबत फोटो काढले आणि त्यांना ऑटोग्राफही दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.