ड्रग्ज प्रकरणात विजेंदर सिंग अडचणीत!

मोहालीमधील झिराकपरूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल १३० कोटी रुपयांचे २६ किलो अंमली पदार्थ सापडले आहेत. हे अमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे तर आणखी एका कारमध्ये १० किलो अमली पदार्थ मिळाले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 8, 2013, 02:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मोहालीमधील झिराकपरूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल १३० कोटी रुपयांचे २६ किलो अंमली पदार्थ सापडले आहेत. हे अमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे तर आणखी एका कारमध्ये १० किलो अमली पदार्थ मिळाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरी कार विजेंद सिंगची आहे की नाही? याची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही. याप्रकरणी अनुपसिंग केहलोन याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विजेंदर सिंग आणि आणखी एक बॉक्सर रामसिंग याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं जातंय. अनुपसिंगनं विजेंदर आणि रामसिंगला अमली पदार्थ पुरविले असल्याचं कबूल केलंय.

याप्रकरणी पोलिस आता विजेंदर सिंगची चौकशी करणार आहेत. तर दुसरीकडे विजेंदरनं आपल्यावरील सारे आरोप फेटाळले आहेत. अनुपसिंग माझ्या नावाचा गैरवापर करतोय करतोय, असंही विजेंदरनं म्हटलंय. ‘ड्रग केसमध्ये माझा काहीही संबंध नाही. माझ्या गाडीतून कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाहीत. चौकशीमध्ये हे उघड होईलच’ असं विजेंदरनं म्हटलंय.
बीजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये पहिलं वहिलं कांस्यपदक मिळवून देणाऱ्या आणि जगभरातील क्रमांक एकचा बॉक्सरचा मान मिळालेला विजेंदरनं या प्रकरणात आपलं नाव ऐकून आश्चर्यचा धक्का बसल्याचं म्हटलंय.