www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिक भारताच्या खात्यात अपेक्षेप्रमाणे पदके मिळाली नाहीत. मात्र, स्पर्धा संपण्याच्या एक दिवस आधी योगेशवर दत्तने चमत्कार करून क्रीडा रसिकांना सुखद धक्का दिली. कुस्तीमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा केले.
६० किलो वजन गटात फ्रिस्टाईल कुस्तीत योगेश्वररने पहिला फेरी गमावल्यानंतरही रिपेचेजमध्ये आलेल्या कांस्य योगाचा अचूक फायदा घेत ऐतिहासिक कामगिरी केली. निर्णायक लढतीत त्याने उत्तर कोरियाच्या जो मायुंग राईला ३-१ ने लोळविले.
ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवून देणारा योगेश्वकर तिसरा मल्ल ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव (हेलान्सिकी १९५२) सुशील कुमार (बीजिंग २००८) यांनी अशी कामगिरी केली आहे.
योगेश्वरच्या कांस्य पदकामुळे लंडनमधील भारताचे हे चौथे कास्य आणि एकूण पाचवे पदक ठरले. विजयकुमार याने रौप्य तर गगन नारंग, मेरी कोम आणि सायना नेहवाल यांनी कांस्य पटकावून यापूर्वी भारताची शान उंचावली आहे. महाबली सतपालच्या या शिष्याने कारकिर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचे स्वप्न साकार करताना बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गुरुबंधू सुशील कुमारने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. या वजनी गटात अझरबैझानच्या असगारोव्ह टोघरुलने सुवर्णपदकाचा मान मिळवला.
योगेश्वारने रेपेचेज राऊंडच्या पहिल्या लढतीत पुएर्ता रिकोच्या फ्रँकलिन गोमज मातोसचा ३-0ने तर दुसर्यार लढतीत इराणच्या मल्ल इस्माईल पुरज्योयबारी मसूदचा ३-१ ने पराभव केला.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील या मल्लाने पहिल्या फेरीत बुल्गारियाच्या अनातोली इलारियोनाव्हिच गुइदियाचा पराभव केला होता, पण उपउपांत्यपूर्व फेरीत त्याला चार वेळा विश्वइविजेतेपदाचा मान मिळवणार्या रशियाच्या बेसिक कुदुखोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. रशियाच्या मल्लाने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे योगेश्वयरला रेपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
योगेश्वरचा जन्म २ नोव्हेंबर १९८२ मध्ये बैसनवाल कालल, जिल्हा सोनीपत, हरियाणा झाला आहे.