लिएंडर पेसनं आपल्या मुलीच्या आईला घराबाहेर काढलं

टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याची लिव्ह इन पार्टर रिया पिल्लई यांच्यातील वाद आता पुन्हा नव्यानं समोर आलेत. आता तर रियानं पेसवर आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी अडवणूक केल्याचा आरोप केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 9, 2014, 04:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याची लिव्ह इन पार्टर रिया पिल्लई यांच्यातील वाद आता पुन्हा नव्यानं समोर आलेत. आता तर रियानं पेसवर आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी अडवणूक केल्याचा आरोप केलाय.
गुरुवारी रात्री रिया पिल्लई मुंबईतील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन दाखल झाली होती. परंतु, रात्री उशीरापर्यंत ही तक्रार दाखल होऊ शकली नाही. नुकतंच, पेसनं फॅमिली कोर्टात आपल्या सहा वर्षांची मुलगी अयाना हिचा ताबा रियाकडे न देता आपल्याकडे देण्यात यावा, अशी मागणी करत एक अर्ज दाखल केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया सायंकाळा साडे सातच्या सुमारास घरी परतली होती तेव्हा पेसनं तिला घरात घुसण्यापासून अडवलं. पेसनं फ्लॅटच्या बाहेर काही गुंडही तैनात करून ठेवले होते, असंही रियानं म्हटलं. या गुंडांनी आपल्याला शिव्या आणि धमकी दिल्याचं रियानं पोलिसांना सांगितलं. यावेळी रियानं पोलीस हेल्पलाईन 103 नंबरवर फोन केला. तक्रार मिळाल्यानंतर एक महिला कॉन्स्टेबल इथं दाखल झाली. पोलिसांना पाहताच पेसनं रियाला घरात प्रवेश देण्याची तयारी दाखवली. परंतु, रिया जेव्हा घरात गेली तेव्हा तिचं सगळं सामान भरून ठेवलेलं तिला आढळलं.
14 ग्रँड स्लॅम आणि 1996 मध्ये ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणाऱ्या लिएंडर पेसनं काही दिवसांपूर्वीच कोर्टात आपलं आणि 48 वर्षीय रिया पिल्लई हिचं लग्न झालंच नसल्याचं सांगितलंय. 2003 साली पेसची आर् ऑफ लिव्हिंगची प्रशिक्षक असलेल्या रियाशी ओळख झाली होती. यानंतर या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. याच दरम्यान, रियाचे संजय दत्तसोबत संबंध संपुष्टात आले होते.
पेसनं केलेल्या दाव्यानुसार, लग्न न करताच रियाला मुलं हवं होतं. जानेवारी 2005 मध्ये रियानं आपला आणि संजयचा घटस्फोट घेतल्याचं आपल्याला खोटंच सांगितलं होतं, असंदेखील पेसनं म्हटलंय. 2005मध्ये उन्हाळ्यातच रियाला बाळाची चाहूल लागली होती परंतु, आपण बाप बनणार असल्याचं पेसला ऑगस्ट 2005 माहीत पडलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.