www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकची धावपटू अंजना ठमकेनं जागतिक स्तरावर देशाचं नाव उज्वल केलंय. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तिला नॅनो कार भेट देत 21 हजार रुपये रोख दिले. मुख्यमंत्री तर दूरच क्रीडामंत्र्यांनी आणि स्थानिक आमदारांनी केवळ तिला आश्वासन दिलीत. अद्यापही तीच कुटुंब झोपडीतच राहते आहे. राष्ट्रीय पातळींवर सर्व खेळाडूंचे विक्रम मोडीत काढून देशाचे नाव उज्वलं करु शकणा-या अंजनाचं वर्तमान मात्र आज अंधारात आहे.
अंजनाच्या आईला चिमणीच्या प्रकाशातच स्वयंपाक करावा लागतो. कुडाच्या भिंती असलेल्या घरात अंजना राहते. इथेच अभ्यासही करते. नाशिकपासून अवघ्या बावीस किलोमिटर अंतरावर असलेल्या गणेश गावात अंजना कुटुंबियांसह राहते..घराजवळील छोटयांश्या तुकड्यावर वडील काहीतरी पिकवितात आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात . त्यांना मदत करत करत अंजना आश्रमशाळेत शिकत असे. तिच्यातील धावण्याचे गुण आणि धावपटूस आवश्यक असणारी अंगकाठी पाहून कविता राऊतचे कोच वीरेंद्र सिंग यांनी तिला कठोर प्रशिक्षण दिले आज तिने आता चीनमध्ये नानजिंग आशियाई युवा धावण्याच्या स्पर्धेतही तिने 800 मीटरमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
सैफिई येथील आयोजित क्रीडा स्पर्धेत तिने 400 आणि 800 मीटरचे नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.आपल्या राज्यातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंगनी तिच्या गुणांना प्रोत्साहन देत तिला नॅनो भेट दिली. मात्र, तिच्याकडे इंधनासाठी पैसे नसल्याने भेट मिळालेली कार आणण्यासाठी तब्बल चार महिने लागले. तिच्या दरिद्री परिस्थितीला पाहून मनसेचे आमदार वसंत गीते यानी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले. आज सहा महिने उलटले तरी तिला काहीही मिळाले नाही.क्रीडा मंत्र्यांनी पाच दहा हजर देत बोळवण केली आहे. आदिवसी विकास विभागाला तर तिचा विसर पडला आहे.
भारतात क्रिकेटपटूंवर कोट्यवधी रुपयांचं मानधन दिलं जातं. परदेशात ऑलिम्पिक खेळाडू घडवण्याकरता कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र सातत्यानं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उंचावणा-या अंजनाकडे महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष होतंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.