शूमाकरवर न्यूरो सर्जरी... पण अजूनही कोमात

सातवेळा फॉर्म्युला वन जगज्जेतेपदाला गवसणी घालणारा माजी एफ वन ड्रायव्हर मायकल शुमाकरवर न्यूरो सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्म्युला वनला अलविदा केल्यानंतर स्केटिंगमध्ये वेगाचा थरार अनुभवणाऱ्या शुमाकरच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आणि सर्वांचा लाडका शुमी कोमात गेला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 31, 2013, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस
सातवेळा फॉर्म्युला वन जगज्जेतेपदाला गवसणी घालणारा माजी एफ वन ड्रायव्हर मायकल शुमाकरवर न्यूरो सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्म्युला वनला अलविदा केल्यानंतर स्केटिंगमध्ये वेगाचा थरार अनुभवणाऱ्या शुमाकरच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आणि सर्वांचा लाडका शुमी कोमात गेला.
दुसऱ्या सर्जरीनंतरही त्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा शुमाकरसह त्याचा १४ वर्षीय मुलगाही होता. हेल्मेट घालून स्किईंगचा आनंद लुटणाऱ्या शुमीचं डोकं एका दगडावर आदळलं. त्यावेळी शुमाकरसह अन्य सहकारीही होते. त्यांनी तातडीनं शुमाकरला हेलिकॉप्टरच्या मदतीने मोटीयर्स येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर शुमाकरची गंभीर परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने न्यूरो सर्जरी करण्याचा निर्णय घेतला

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.