www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूर शासकीय रूग्णालयातल्या डॉक्टरांचा मनमानीपणा चव्हाट्यावर आलाय. कुत्र्यानं चावा घेतलेल्या एका मुलीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झालाय. मृत्यूनंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राखून ठेवल्यामुळं डॉक्टर आणि मृताच्या नातेवाईकात वाद झाला. उपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
बार्शीच्या नारी वाडीतल्या प्रणाली वाघ या 9 वर्षांच्या मुलीचा सकाळी कुत्र्यानं चावा घेचला. कुत्र्यानं डोळ्याजवळ चावा घेतल्यानं तिची प्रकृती गंभीर झाली होती. प्रणालीला तातडीनं उस्मानाबाद इथल्या सरकारी इस्पितळात नेलं. तिथं उपचारा दरम्यान तिची प्रकृती आणखी खालावल्यामुळं तिला तातडीनं सोलापूरला शासकीय रूग्णालयात हलवण्यात आलं.
शासकीय रूग्णालयात कुत्रा चावलेला असताना साधा केसपेपरही तयार करण्यात आला. शुक्रवारी तिचा रात्री मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्यावर आपल्या उपचारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जाऊ नये यासाठी डॉक्टरांनी तिची एमएलसी तयार केली. मृत्यूनंतर एमएलसीत बदल करता येत नाही, तरीही डॉक्टरांनी ते केलं. कुत्रा चावलेली एमएलसी किंवा त्यावर विच्छेदन होत नसतानाही तिचा मृतदेह विच्छेदनासाठी राखून ठेवण्यात आला. मुलीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.
तर वेळीच रेबीजचं इंजेक्शन मिळालं असतं तर मुलीचा जीव वाचला असता असं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. कुत्रा चावल्यावर रेबीजचं इंजेक्शन मिळालं नसेल, तर हे धक्कादायक आहे. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला होता का याचाही तपास व्हायला हवा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.