www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
आधार कार्ड बनवून देतो असं सांगत शेकडो नागरिकांना गंडा घालणा-या भामट्याला पिंपरी-चिंचवडमध्ये अटक करण्यात आली आहे. आधार कार्ड बनवून देण्यासाठी त्यानं अजब शक्कल लढवली. पण शेवटी तो जाळ्यात अडकलाच.
पिंपरी चिंचवड मधल्या फिनो या सरकारने आधारकार्ड बनवून देण्यासाठी नेमलेल्या कंपनीत काम करणा-या एका भामट्यानं अजब शक्कल लढवली. राजेश इंदर्जीत प्रसाद असं या भामट्याच नाव...तो सकाळी आधार कार्ड बनवून देणाऱ्या या कंपनीत काम करायचा आणि संध्याकाळी या कंपनीतलं साहित्य घेऊन जायचा. या साहित्याचा वापर करत त्यानं देहू रोड परिसरात कार्यालय थाटलं आणि नागरिकांकडून ३०० ते ५०० रुपये घेऊन आधार कार्ड बनवून देण्याचा धंदा सुरु केला. अनेक नागरिकांकडून त्यानं असे पैसे उकळले. त्याच्या या उद्योगाची माहिती अखेर पोलिसांना मिळाली आणि या भामट्याला अटक करण्यात आली.
आरोपीला जरी अटक करण्यात आली असली तरी त्यानं अनेक जणांना अडचणीत आणलंय. पण वेळीच त्याला अटक झाल्यामुळं आणखी अनेक जणांची फसवणूक होणं टळलंय.