बारावीचा आतापर्यंतचा सर्वाधिक 90.3 टक्के निकाल, कोकण अव्वल!

बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 90.3 टक्के एवढा बारावीचा निकाल लागलाय. यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. सर्वच विभागामध्ये मुली अव्वल आहेत. तर विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 2, 2014, 12:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 90.3 टक्के एवढा बारावीचा निकाल लागलाय. यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. सर्वच विभागामध्ये मुली अव्वल आहेत. तर विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय.
गेल्या वर्षी पेक्षा 14.96 टक्क्यांनी उत्तीर्णांमध्ये वाढ झालीय. एकूण 10 लाख 89 हजार 332 विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण 93.5 टक्के तर मुलांचं 87.23 टक्के आहे. गेल्या वर्षी एकूण 75.77 टक्के निकाल लागला होता.
पाहूया विभागवार आकडेवारी
> नागपूर विभाग- 89.7 टक्के
> लातूर - 90.60 टक्के निकाल
> नाशिक विभाग- 88.71 टक्के निकाल
> अमरावती - 91.85 टक्के निकाल
> कोल्हापूर - 91.54 टक्के निकाल
> मुंबई- 88.30 टक्के निकाल
> पुणे - 90.73 टक्के निकाल
> औरंगाबाद- 90.98 टक्के निकाल
> सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा- 94.85 टक्के
विज्ञान शाखेत सर्वाधिक 93.67 निकाल लागला. तर कला शाखा 86.33, कॉमर्स - 89.97 आणि एमसीव्हीसी शाखेचा 89.66 टक्के एवढा निकाल लागलाय.

आज दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येतील
www.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org आणि

www.rediff.com/exam या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.