www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात ३ काळविटांची शिकार करण्यात आली आहे. कामती इथली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली. शिका-यांना पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५० जिवंत काडतुसं आणि २ मृत काळवीट जप्त केले.
सोलापूर जिल्ह्यातले वन्यजीव शिका-यांच्या दृष्टीनं सहज आणि सोप्या शिकारीचं ठिकाण झालंय की काय असं म्हणण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी बोरामणीच्या वन विभागाच्या जमिनीवर मुंबईच्या शिका-यांना काळविटाची शिकार करताना अटक केली होती. आणि आता मोहोळ तालुक्यातल्या वाघोली वन विभागात ३ काळविटांची शिकार करणा-या टोळीला कामती पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. वाघोलीच्या माळावर पहाटे शिकार करत असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शिकार केलेले दोन काळवीट आणि 50 जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.
सोलापुरात शिका-यांची मोठी साखळीच असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र शिकारीच्या या घटनेतून सोलापूर वनविभाग किती सुस्त आहे हेच दिसून येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.