ऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?

डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 2, 2013, 10:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.
पुण्यात आज अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची तारांबळ उडवली. ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली असतानाच गेल्या २ दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. अशातच दुपारी पावसाला सुरुवात झाली. थंडी नसल्यानं उबदार कपडे घरी ठेवून आलेल्या लोकांना अचानकपणे रेनकोट तसंच छत्रीची गरज भासली. त्यामुळं हवामान आणि ऋतुमानाचं हे चाललंय तरी काय, असा प्रश्न पडलाय.
तर मुंबईसह राज्याच्या बहुतेक भागात घामाच्या धारांनी लोक बेजार झालेत. हवेतला गारठा कमी झाल्यामुळं आजारांनीही डोकं वर काढलंय. नाशिकमध्ये तर चक्क कडाक्याच्या उन्हाळ्यात असतं इतकं २८अंश कमाल तापमान नोंदवण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.