दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट

दिवाळी आणि प्रवाशांची लूट हे जणु समिकरण बनलय. दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी फुल्ल असल्याचं फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स सर्वसामन्य प्रवाशांकडुन अतिरीक्त पैसा उकळतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 25, 2013, 09:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
दिवाळी आणि प्रवाशांची लूट हे जणु समिकरण बनलय. दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी फुल्ल असल्याचं फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स सर्वसामन्य प्रवाशांकडुन अतिरीक्त पैसा उकळतात. कोल्हापुरातही काही वेगळी परिस्थिती नाहीय.
दिवाळीचा आनंद आपल्या घरच्यांसोबत साजरा करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. त्यासाठी आपल्या गावाला जाण्याची धडपड सर्व जण करत असतात. राज्य परिवहन मंडळाकडून अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. मात्र प्रवाशांच्या वाढत्या रेट्यापुढे ही संख्या कमी आहे. त्यामुळे खासगी बसनं जाण्याशिवाय अनेक प्रवाशांना पर्याय नसतो. त्यांच्या याच गरजेचा गैरफायदा ट्रॅव्हल्स कंपन्या घेतात. मुंबई कोल्हापूर हे तिकीट एरवी 300 रुपये असतं पण आता हेच तिकीट 550 वर पोहचलंय. तर कोल्हापूर-पुणेचे दर 200 रुपयावरुन 300 ते 400 झालेत.

रेल्वेनं जाऊ इच्छिणा-या प्रवाशांच्या अडचणी तर आणखी बिकट आहेत. कारण 15 दिवसांपूर्वीच सर्वच गाड्यांची आरक्षण पूर्ण झालीत. रेल्वे आणि बस दोन्ही फुलं असल्यानं ऐन दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅवल्सकडून वारेमाप लूट सुरु आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी यामध्ये लक्ष घालून ही लुट थांबवावी अशी मागणी होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x