राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 8, 2013, 08:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,पुणे
पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.
राज्य सरकारच्या स्थानिक लेखा परीक्षण समितीच्या अहवालामुळे पुणे महापालिकेतला गैरव्यवहार चव्हाट्यावर आलाय. हा गैरव्यवहार झालाय तो ओटा मार्केटच्या बांधकामात. तब्बल ९ कोटी १९ लाख रुपयांची अनियमितता ओटा मार्केटच्या बांधकामात झालीय, असा स्पष्ट ठपका या लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आलाय.
कोटींचा गैर व्यवहार असलेलं हे ओटा मार्केट नेमकं काय आहे?
- पथारीवाल्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ओटा मार्केट स्कीम तयार करण्यात आली.
- केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत यासाठी निधी मिळाला
- सत्तावीस कोटींच्या प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली
- पाच ठिकाणी १० हजार २६५ ओटे बांधण्यात आले.…
आता यातली अनियमितता पहा…
- महापालिकेनं प्रकल्प अहवालानुसार काम केलंच नाही. म्हणजेच केंद्र सरकारची फसवणूक करण्यात आली.
- ओटा मार्केटसाठी अनेक ठिकाणी जागा ताब्यात नसताना, महापालिकेनं जागा ताब्यात असल्याचं दाखवलं.
- बांधकाम करताना कमी क्षेत्रफळाचे ओटे बांधण्यात आले.
- धक्कादायक बाब म्हणजे या ओट्यांचे बांधकाम करताना महापालिकेनंच नियममं धुडकावले.… बंर असे अनेक गैरप्रकार करून हे ओटे अभारण्यात आले खरे. मात्र अनेक ओटे तसेच पडून आहेत. लाभार्थींना त्यांचं वाटपाच करण्यात आलेलं नाही.
या सर्व गैरव्यवहारावर महापालिकेचा खुलासाही मागवण्यात आला होता. त्यावर महापालिकेचा कोडगेपणा असा की खुलासा तर सोडा, महापालिकेनं साधं उत्तरही दिलेलं नाही. म्हणजे गैरव्यवहार करा आणि ते दडपून टाका अशीच महापालिकेची भूमिका दिसतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.