www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.
`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या दरामध्ये दर तीन वर्षांनी वाढ करण्याचे करारामध्ये नमूद करण्यात आले असून, २०३० पर्यंत त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळं `एक्स्प्रेस वे`ने ये-जा करणाऱ्या कार आणि हलक्या वाहनांना सध्या १६५ रुपये द्यावे लागतात. उद्यापासून त्यांना १९५ रुपये मोजावे लागणार आहेत. कार आणि हलक्या वाहनांच्या टोलच्या दरामध्ये ३० रुपयांनी वाढ होणार आहे.
मिनीबससाठी सध्या २५५ रुपये आकारले जातात. त्यामध्ये ४५ रुपयांची वाढ होणार असून, त्यांना ३०० रुपये द्यावे लागणार आहेत. बसकडून सध्या आकारण्यात येणाऱ्या टोलची रक्कम ४८५ रुपये आहे, त्यामध्ये ८७ रुपयांची वाढ होणार असून, ही रक्कम ५७२ रुपये होणार आहे.
थ्री अँक्सल वाहनांसाठी ८३८ रुपये घेण्यात येतात, त्यांना आता ९९० रुपये द्यावे लागणार आहेत. तर मल्टी अँक्सल वाहनांकडून सध्या टोलपोटी १११६ रुपये घेतले जातात, नव्या दरानुसार त्यांना १३१७ रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रकसाठी पूर्वी ३५४ रुपये टोल घेतला जायचा आता त्यासाठी ४१८ रुपये द्यावे लागणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.