www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. महिला अधिकारांसाठी सचिनची लोकप्रियता वापरण्यात येत आहे. सचिनने एक मराठीत कविला गायली आहे. अभिनेता फरहान अख्तरच्या ‘मर्द’ या मोहिमेसाठी ही कविता सादर करण्यात आली आहे.
मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रीमिनेशन (मर्द) (बलात्कार आणि भेदभाव या विरोधात पुरूष) असे अभियान दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरने सुरू केले आहे. त्यासाठी मराठीत ही कविता म्हटली आहे. महिला अधिकारांप्रती पुरूषांना जागरूत करण्यासाठी ही कविता म्हटली गेली आहे.
सचिन तेंडुलकरने महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि महिलांबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी सचिनने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती ‘मर्द’कडून देण्यात आली.
महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि पुरूषांमध्ये महिलांबद्दल आदर निर्माण होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. लैंगिक समानता येण्यासाठी आणि यामधील संबंध चांगले राहण्यासाठी मराठीतून ही कविता सादर करण्यात येत आहे, असे मर्दकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सचिनची देशातील वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन सचिनला या अभियनात सामावून घेतले आहे. त्यामुळे या अभियानात अनेक जण सचिनचा आदर्श घेऊन पुढे येतील आणि काम करण्यात प्रोत्साहीत होतील, सांगण्यात आलेय.
ही मराठी कविता गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी लिहिली आहे. ही कविता मूळ हिंदीतून लिहिण्यात आली आहे. या कवितेचा अनुवाद मराठी, तेलगुस तामिळ, पंजाबी आणि अन्य भाषांतून करण्यात आला आहे. तेलगुमध्ये टॉलीवूड स्टार महेश बाबू सादर करणार आहे. या कवितेचा अनुवाद अभिनेता जितेंद्र जोशीने अनुवाद केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.