`सेकंडलास्ट` टेस्ट मॅचमध्येही सचिननं तोडले रेकॉर्ड!

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज कोलकाताच्या ‘सेकंडलास्ट’ टेस्टमॅचमध्ये सारे जण सचिनची बॅटिंग पहायला उत्सुक असताना सचिनने विकेट घेत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 6, 2013, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज कोलकाताच्या ‘सेकंडलास्ट’ टेस्टमॅचमध्ये सारे जण सचिनची बॅटिंग पहायला उत्सुक असताना सचिनने विकेट घेत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला. शेन शिलिंडफोर्डला एलबीडब्ल्यू करत सचिनने आपल्या करियरमधील २०० वी विकेट घेण्याची किमया केली. त्याचप्रमाणेचा कोलकत्याच्या याच ईडनवर सचिननं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय... तो म्हणजे एकाच मैदानावर सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्ड...
२०० व्या टेस्ट मॅचनंतर आपण निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सचिनच्या सेकंडलास्ट मॅचसाठी म्हणजेच १९९ वी मॅच पाहण्यासाठीही प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. जणू काही फक्त सचिनलाच पाहण्यासाठी मैदानावर जमलेल्या क्रिकेट रसिकांसमोर सचिननं ईडन गार्डनवर प्रवेश केला आणि त्याचबरोबर आणखी एक रेकॉर्ड सचिनच्या नावावर नोंदविला गेला... मैदानावर सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्ड... हा रेकॉर्ड आत्तापर्यंत लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर होता.
ईडन गार्डनवर आपल्या कारकिर्दितली तेरावी टेस्ट मॅच सचिन या मैदानावर खेळत आहे. एकाच मैदानावर १३ कसोटी खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सुनील गावसकर यांच्या नावावर चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर १२ टेस्ट मॅच खेळण्याच्या विक्रमाची नोंद आहे.

सचिननं आत्तापर्यंत ईडन गार्डनवर १२ टेस्ट मॅचमध्ये ४७.८८ च्या सरासरीनं ८६२ रन्सची नोंद केलीय... आता या टेस्ट मॅचनंतर हा आकडा कितीनं वाढतो, याकडे ‘सचिन’ रसिकांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.