www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
सचिन तेंडुलकर आता नावाचाच देव राहिला नाही तर खरोखरच त्याचं आता मंदिर होतंय. बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही आज रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच होणार आहे.
पाटण्यापासून १०० किलोमीटरवर असलेल्या कैमूर जिल्ह्यात असलेल्या गावानं सचिनचं भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केलाय. सचिनचा मोठा चाहता असलेला भोजपुरी नायक मनोज तिवारीनं. कैमूर जिल्ह्यात असलेलं अथरवलिया हे गाव मनोज तिवारीचं जन्मगाव आहे. मात्र, मंदिर बनविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी मिळून घेतला असल्याच तिवारी यांचं म्हणणं आहे.
राजस्थानमधील एका कारागिराकडं सचिनची संगमरवरी दगडातील सव्वापाच फुटांची मूर्ती घडविण्याचं काम सोपविण्यात आलंय. मंदिरासाठी अंदाजे ७० लाख रुपये खर्च येणार असल्याचं सांगितलं जातंय. मनोज तिवारी यांच्या माहितीनुसार, ६००० चौरस फूट जागेवर बनणाऱ्या या मंदिराच्या गाभाऱ्यात सचिन तेंडुलकरची मूर्ती स्थापन करण्यात येईल. निळी जर्सी आणि हातात वर्ल्डकप असलेली ही मूर्ती आहे. सचिनसोबतच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि युवराजसिंग यांचीही छोटी मूर्ती मंदिरात ठेवणार असल्याचं सांगण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.