मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार

एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 12, 2017, 07:13 PM IST
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार title=

मुंबई : आशीष शेलार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पवारांपाठोपाठ माजी कसोटीवर दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस लोढा समितीच्या शिफारशीनुसार एमसीएच्या आगामी निवडणुका घेणं आणि तोवर एमसीएचा कारभार चालवणं अशी आव्हानं आशीष शेलार यांच्यासमोर राहतील. आशीष शेलार हे सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीत पंकज ठाकूर , विनोद देशपांडे उपाध्यक्षपदी असतील.