ज्वाला गुट्टा प्रचंड संतापली, बॅडमिंटन असोसिएशनवर आगपाखड

महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी यांचा ऑलिम्पिक तयारी टीममध्ये समावेश करण्यात न आल्यानं ज्वाला गुट्टा प्रचंड संतापलीय. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियावर तिनं जोरदार आगपाखड केलीय. आमचे हैदराबादचे प्रतिनिधी प्रसाद भोसेकर यांना दिलेल्या मुलाखतीत ज्वालानं काय भडीमार केलाय. 

PTI | Updated: Jul 2, 2015, 09:00 AM IST
ज्वाला गुट्टा प्रचंड संतापली, बॅडमिंटन असोसिएशनवर आगपाखड  title=

हैदराबाद : महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी यांचा ऑलिम्पिक तयारी टीममध्ये समावेश करण्यात न आल्यानं ज्वाला गुट्टा प्रचंड संतापलीय. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियावर तिनं जोरदार आगपाखड केलीय. आमचे हैदराबादचे प्रतिनिधी प्रसाद भोसेकर यांना दिलेल्या मुलाखतीत ज्वालानं काय भडीमार केलाय. 

बॅडमिंटन खेळाडूंना सरकारचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. एकेरीत खेळाडूंची कामगिरी चांगली होण्यामागील कारण सरकारतर्फे दिली जाणारी मदत हे आहे. सरकारचा पाठिंबा नसेल, तर खेळाडूंना पराभवाचे तोंड पाहावे लागते. खरेतर आम्ही सरकारच्या मदतीवर विसंबून असतो. सरकारकडून पाठिंबा मिळत नसल्याने खेळाडू दुहेरीकडे वळताना धास्तावतात. याशिवाय मिश्र प्रकारातही माझ्यानंतर खेळाडू सापडेनासे झाले आहेत. मी विश्वक्रमवारीत सहाव्या स्थानावर होती, पण त्यानंतर एकही खेळाडू देशातर्फे पुढे आलेला नाही, असे ज्वाला गुट्टा म्हणाली.

ज्वाला गुट्टा हिने पुढील वर्षी रियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी किमान सरकारने आमची मदत करावी, असे आवाहन केले. आघाडीच्या खेळाडूंना जशी मदतीची गरज असते तीच गरज आम्हालादेखील आहे. अर्थात, एकेरीतील खेळाडूंना ज्या सुविधा पुरविल्या जातात त्याच सुविधा आम्हाला मिळायला हव्यात. सोयी मिळाल्यास मी आणि आश्विनी ऑलिम्पिक पदक जिंकू शकतो.

आम्हाला दूर ठेवण्यात ज्यांचा हात असेल त्यांनी आतातरी जागे व्हावे. खेळाडू म्हणून मी सराव करू शकते. आपल्या खेळाचा दर्जा उंचावू शकते. खेळातील उणिवा दूर सारू शकते. मला दिल्लीत कुणाच्या मागे धावण्याची गरज पडू नये. ऑलिम्पिकसाठी दुहेरीत भारताला पदकाची अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर सहकार्याची गरज राहील. कॅनडा ओपन जिंकल्यानंतर किमान क्रीडा मंत्रालय आमच्या पाठीशी उभे राहील आणि सहकार्याचा हात देईल, अशी आशा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.