बिग बींच्या पी.व्ही.सिंधूला शुभेच्छा, शोभा डेंना चिमटे

पी.व्ही.सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयानंतर पी.व्ही.सिंधूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Aug 18, 2016, 10:23 PM IST
बिग बींच्या पी.व्ही.सिंधूला शुभेच्छा, शोभा डेंना चिमटे  title=

रिओ : पी.व्ही.सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयानंतर पी.व्ही.सिंधूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. 

या शुभेच्छा देताना बिग बींनी शोभा डेंना नाव न घेता चिमटे काढले आहेत. पी.व्ही.सिंधू आप खाली हाथ नही, मेडल लेके वापस आ रहे है... और हम आपके साथ सेल्फी निकालना चाहते है, असं ट्विट बिग बींनी केलं आहे. तसंच आपने बोलने वालोंकी बोलती बंद कर दी... कर्म बोलता है और वो कभी कभी 'कलम' को भी हरा देती है, बधाई! असंही अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.