कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर

भारतात सध्या सचिन नंतर जर कोणत्या क्रिकेटरला अधिक पंसती मिळत असेल तर तो आहे विराट कोहली. अनेक तरुणींमध्ये विराटची क्रेझ आहे. काही विदेशी महिला खेळाडूंनी ही विराट बदल असलेल्या त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इंग्लंडच्या डेनियल विएटने विराटला प्रपोज देखील केलं होतं. आता आणखी एका तरुणीने विराटबाबत असलेल्या तिच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

Updated: Apr 21, 2016, 12:43 PM IST
कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर title=

मुंबई : भारतात सध्या सचिन नंतर जर कोणत्या क्रिकेटरला अधिक पंसती मिळत असेल तर तो आहे विराट कोहली. अनेक तरुणींमध्ये विराटची क्रेझ आहे. काही विदेशी महिला खेळाडूंनी ही विराट बदल असलेल्या त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इंग्लंडच्या डेनियल विएटने विराटला प्रपोज देखील केलं होतं. आता आणखी एका तरुणीने विराटबाबत असलेल्या तिच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

ही तरुणी अँकरिंग करते आणि आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये खेळाडूंशी बातचित करते. रॉशेल राव बिग बॉसमध्ये देखील स्पधर्क म्हणून होती. झलक दिखलाजा आणि फेमिना मिस इंडिया मध्ये ती दिसली होती. एका इंटरव्यूमध्ये तिने म्हटलं की तिला विराट हा पसंद आहे. कोहली शिवाय तिला धवन, कुणाल पांड्या, वॉर्नर आणि ड्युप्लेसी यांची खेळण्याची स्टाईल देखील आवडते.

रॉसेल ही लवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहे. पण या शोमध्ये ती काय भूमिका करणार आहे याबाबत गुप्तता पाळली आहे. त्यासाठीचं शुटींग देखील तिने पूर्ण केलं आहे.