चेन्नई : भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तामीळनाडू प्रिमियर लीगची मॅच खेळताना चांगलाच भडकला. चीपॉक सुपर गिलीस आणि दिंडीगुल ड्रॅगन्समध्ये झालेल्या मॅचवेळी अश्विन प्रतिस्पर्धी बॉलरवर धावून गेला. अश्विननं या बॉलरवर बॅटही उगारली.
गिलीस टीमचा स्पिनर आर.साईकिशोरनं दिंडीगुलचा बॅट्समन जगदीशन नारायणची विकेट घेतली. ही विकेट घेतल्यानंतर साईकिशोर आणि नारायणची बाचाबाची झाली. या दोघांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली.
हे सुरु असताना नॉन स्ट्रायकर एन्डला असलेला अश्विन मध्ये पडला आणि त्यानंही बॉलरशी वाद घालायला सुरुवात केली. गिलीस टीमचा कॅप्टन आर. सतिश आणि अम्पायरनी हा वाद मिटवला.
पाहा बाचाबाचीचा हा व्हिडिओ