पाकिस्तानला हरवत बांगलादेश भारतासोबत फायनलमध्ये

 पाकिस्तानच्या १३० धावांचा पाठलाग करताना सोमय्या सरकार याने ४८ चेंडूत ४८ धावा केल्या. 

Updated: Mar 2, 2016, 10:38 PM IST
पाकिस्तानला हरवत बांगलादेश भारतासोबत फायनलमध्ये title=

 

मीरपूर :  बांगलादेश शानदार खेळी करत पाकिस्ताना नमवत आणि आशिया कपमधून बाहेरचा रस्ता दाखवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

बांगलादेशने यापूर्वी यूएई आणि श्रीलंकेला नमवून ४ पाइंट्स मिळविले होते. आजच्या विजयाने त्यांनी सहा पॉइंट्स सह फायनलमध्ये जागा मिळविली आहे. 

पाकिस्तानच्या १३० धावांचा पाठलाग करताना सोमय्या सरकार याने ४८ चेंडूत ४८ धावा केल्या. 

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ७ बाद १२९ धावा केल्या.  पाकिस्तानकडून विकेटकीपर सरफराज अहमद याने ५८ धावा तर शोएब मलिक ४१ धावा केल्या. तर बांगलादेशकडून अल-आमिन हुसेन याने २५ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. आफारत सनी याने २ विकेट घेतल्या.