टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरवर बोलला बेन स्टोक्स

टी-20 वर्ल्डकप फाइनल ओवरमध्ये लागोपाठ ४ बॉलमध्ये ४ छक्के लागल्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे व्हिलन ठरलेला बेन स्टोक्सने त्याच्या शेवटच्या ओव्हरवर ट्विट केलं आहे. 

Updated: Apr 4, 2016, 09:49 PM IST
टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरवर बोलला बेन स्टोक्स title=

कोलकाता : टी-20 वर्ल्डकप फाइनल ओवरमध्ये लागोपाठ ४ बॉलमध्ये ४ छक्के लागल्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे व्हिलन ठरलेला बेन स्टोक्सने त्याच्या शेवटच्या ओव्हरवर ट्विट केलं आहे. 

स्टोक्सने मॅचनंतर ट्विट केलं आहे की, 'निराशाजनक अंतिम ओवर नंतर ही सपोर्टसाठी आभारी आहे. मला वर्ल्डकप फाइनलमध्ये देशाकडून खेळल्याचा अभिमान आहे.'

शेवटची ओव्हरच मॅचची निर्णायक बाजू ठरली. ४ बॉलमध्ये ४ सिक्स लागल्यानंतर स्टोक्सला रडू कोसळलं. त्याला अश्रृ अनावर झाले होते.