नवा पाहुणा घरी येणार असल्याने २ मॅचमध्ये दिसणार नाही गेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुढच्या २ मॅचमध्ये क्रिस गेल विनाच खेळावं लागणार आहे.

Updated: Apr 19, 2016, 05:40 PM IST
नवा पाहुणा घरी येणार असल्याने २ मॅचमध्ये दिसणार नाही गेल title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुढच्या २ मॅचमध्ये क्रिस गेल विनाच खेळावं लागणार आहे. विस्फोटक खेळाडू क्रिस गेलच्या घरी नवा पाहुणा येणार आहे त्यामुळे तो पुढच्या २ मॅचमध्ये टीममध्ये दिसणार नाही आहे. तो जमैकाला जाण्यासाठी निघाला आहे. 

गेलची पत्नी नताशा आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. गेलने त्याच्या इंस्टग्राम पेजवर विमानातील फोटो टाकले आहेत. आणि मी रस्त्यात आहे बेबी असं देखील म्हटलं आहे.

मागच्या २ मॅचमध्ये गेल हा ऐवढी कमाल नाही करु शकला पण कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. आगामी २० आणि २२ एप्रिलच्या सामन्यांमध्ये गेलशिवाय बंगळुरु टीम मैदानात उतरणार आहे. 

 

I'm on my way, Baby.

A photo posted by KingGayle(@chrisgayle333) on