टीम इंडियात खेळण्याच्या लायकीचे नाहीत धोनी, रैना - माजी कॅप्टन

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांना आयपीएलमध्ये जास्त महत्त्व दिलं जात असल्याने त्यांची माजी भारतीय कॅप्टन बिशन सिंह बेदी यांनी निंदा केली आहे. दोघेही टीम इंडियामध्ये खेळण्याचे लायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

Updated: Dec 19, 2015, 10:09 PM IST
टीम इंडियात खेळण्याच्या लायकीचे नाहीत धोनी, रैना - माजी कॅप्टन title=

मुंबई : भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांना आयपीएलमध्ये जास्त महत्त्व दिलं जात असल्याने त्यांची माजी भारतीय कॅप्टन बिशन सिंह बेदी यांनी निंदा केली आहे. दोघेही टीम इंडियामध्ये खेळण्याचे लायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

'जगातील सर्वात श्रेष्ठ फिनीशर म्हणून ओळख असणाऱ्या महेंद्र सिंग धोनी आणि एक यशस्वी बॅट्समन सुरेश रैना यांच्या लोकप्रियतेला अनावश्यक महत्त्व दिलं जातंय. एक तर रिटायर्ड झाला आहे आणि दुसरा टीममध्ये जागा मिळावी यासाठी संघर्ष करतोय', असं बेदी यांनी म्हटलंय.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी क्रिकेट प्रशासन हे चूकिच्या हातांमध्ये असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. टी-20 क्रिकेटला अनावश्यक महत्त्व दिलं जात असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.