ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयनं आज टीम इंडियांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये दोघांनी कमबॅक केलंय.

Updated: Dec 19, 2015, 10:31 PM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयनं आज टीम इंडियांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये टी-२० टीममध्ये युवराज सिंग आणि आशिष नेहरा यानेही कमबॅक केलं आहे.

वनडे आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटसाठी टीमचा कॅप्टन हा महेंद्र सिंग धोनी असणार आहे. 

रविंद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरोधात केलेल्या कामगिरीमुळे जडेजा यालाही वनडे आणि टी-२० या दोन्ही टीममध्ये संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त खेळ दाखवणाऱ्या युवराज सिंगलाही संधी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये 5 वनडे आणि 3 टी-२० सामने खेळले जाणार असून 6 जानेवारीला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याची शक्यता आहे.

वनडे टीम : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, महेंद्र सिंग धोनी, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शम्मी, अक्शर पटेल, इशांत शर्मा, गुरकीरत सिंग, ऋषी धवन, ब्रेंदर स्रन, उमेश यादव

टी-२० टीम : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग,  महेंद्र सिंग धोनी, आर. अश्विन, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, हरभजन सिंग, उमेश यादव, हार्दिक, भूवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, मोहम्मद शम्मी