पाकिस्तानी जर्सीवर धोनीचे नाव

भारताचा वनडे कर्णधार महेंद्र सिंग धोनी जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतात धोनीचे कोट्यावधी फॅन्स आहेत. मात्र जगात असा कोणताच देश नाही जिथे त्याचे फॅन्स नाहीत. 

Updated: Dec 30, 2016, 12:46 PM IST
पाकिस्तानी जर्सीवर धोनीचे नाव title=

मेलबर्न : भारताचा वनडे कर्णधार महेंद्र सिंग धोनी जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतात धोनीचे कोट्यावधी फॅन्स आहेत. मात्र जगात असा कोणताच देश नाही जिथे त्याचे फॅन्स नाहीत. 

पाकिस्तानातही धोनीचे अनेक चाहते आहेत. असाच धोनीचा एक फॅन मेलबर्नच्या स्टेडियमवरील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. 

धोनीच्या या चाहत्याने पाकिस्तानची जर्सी घातली होती. मात्र त्यावर नाव होते धोनीचे. तसेच जर्सीवर ७ हा नंबरही होता. स्टेडियममध्ये जेव्हा कॅमेऱ्याची त्याच्यावर नजर पडली तेव्हा सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर धोनीचा हा चाहता व्हायरलही होतोय.