धोनीच्या शतकी खेळीने झारखंडची सन्मानजनक धावसंख्या

कर्णधारपदावरुन निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. त्यांच्या शतकी आणि झंझावाती खेळीच्या जोरावर झारखंडची धावसंख्या 6 बाद 57वरुन 9 बाद 243 वर पोहोचली. 

Updated: Feb 26, 2017, 03:25 PM IST
धोनीच्या शतकी खेळीने झारखंडची सन्मानजनक धावसंख्या title=

कोलकाता : कर्णधारपदावरुन निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. त्यांच्या शतकी आणि झंझावाती खेळीच्या जोरावर झारखंडची धावसंख्या 6 बाद 57वरुन 9 बाद 243 वर पोहोचली. 

विजय हजारे चषक स्पर्धेतील झारखंड आणि छत्तीसगड यांच्यातील सामन्यादरम्यान धोनीने 6 षटकार आणि 10 चौकारांसह विस्फोटक खेळी खेळताना 120.66 च्या स्ट्राईक रेटने 129 धावा तडकावल्या. 

त्याच्या या खेळीमुळे झारखंडला 243 धावांचा टप्पा गाठता आला. धोनी जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा झारखंडची अवस्था 6 बाद 57 होती. 100च्या आतच झारखंडचा डाव आटोपतोय अशी स्थिती होती. मात्र धोनीचा तो आक्रमक खेळ पुन्हा पाहायला मिळाला. धोनीने शाहजाब नदीम(53) सह मिळून 151 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि सामन्याचा रंगच बदलला.