धोनीची पत्नी साक्षीचा बेबी बंप फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच बाबा होणार आहे. ही बातमी सर्वांनाच माहित आहे. मात्र, पहिल्यांदा धोनीची पत्नी साक्षी बेबी बंपच्या स्वरुपात नजरेला पडली. असे असताना धोनीने कधी सांगितले नाही की, मी बाबा होणार आहे म्हणून!

Updated: Jan 17, 2015, 10:43 PM IST
धोनीची पत्नी साक्षीचा बेबी बंप फोटो व्हायरल  title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच बाबा होणार आहे. ही बातमी सर्वांनाच माहित आहे. मात्र, पहिल्यांदा धोनीची पत्नी साक्षी बेबी बंपच्या स्वरुपात नजरेला पडली. असे असताना धोनीने कधी सांगितले नाही की, मी बाबा होणार आहे म्हणून!

धोनीची पत्नी साक्षी हिचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत साक्षी ही गरोदर असल्याचे दिसत आहे. या फोटोवरुन स्पष्ट होत आहे की, धोनी लवकरच बाबा होणार आहे.

याआधी साक्षीचा असा फोटो पाहायला मिळाला नव्हता. मात्र, इंटरनेटवरील या फोटोतून साक्षी प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे धोनी बाबा होणार हे आता स्पष्टच झाले आहे. साक्षी आणि महेंद्रसिंग धोनीचा ४ जुलै २०१० रोजी विवाह झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.