न्यूझीलंडचा इंग्लंडवर ८ विकेटने विजय ( पाहा स्कोअरकार्ड )

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नववा सामना होत आहे.  

Updated: Feb 20, 2015, 12:32 PM IST
न्यूझीलंडचा  इंग्लंडवर ८ विकेटने विजय ( पाहा स्कोअरकार्ड ) title=

वेलिंग्टन : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नववा सामना झाला. न्यूझीलंडने  इंग्लंडवर ८ विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या वेलिंग्टन वन-डेत इंग्लंडला किवींनी अक्षरश: धूळ चारली.

प्रथम बॅटिंग करणा-या इंग्लंडला किवी बॉलर टीम साऊदीने ७ विकेट्स देत दणका दिला. आणि अवघ्या ३३.२ ओव्हर्समध्ये १२३  रन्सवर इंग्लिश इनिंग आटोपली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या किवींनी १२४ रन्सचं टार्गेट २ विकेट्स गमावत १३व्या ओव्हरमध्येच पार केलं ते ब्रँडन मॅककलमच्या वेगवान हाफ सेंच्युरीच्या जोरावर. मॅककलमने १८ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी झळकावत वर्ल्ड कपमधील वेगवान हाफ सेंच्युरीची नोंद केली. त्याच्या ७७  रन्सच्या खेळीत ८ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.