कोलकाता : मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स दुखापतीमुळे तो भारताविरुद्धच्या पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
कटक येथील दुसऱ्या वनडेदरम्यान हेल्सच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. आज तो इंग्लंडला परतणार आहे. दरम्यान, सॅम बिलिंग तिसऱ्या वनडेत सलामीला येऊ शकते.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने दोन वनडे जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. दरम्यान, टी-२० मालिकेसाठी हेल्सच्या जागी जोनाथन बेअरस्ट्रॉला संघात स्थान देण्यात आलेय.