ICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती. 

PTI | Updated: Feb 11, 2015, 07:31 PM IST
ICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली title=

क्राइस्टचर्च: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती. 

कँटरबरी जिल्हा कमांडर सुपरिटेंडेंट गैरी नोल्स यांनी सांगितलं की, चोरी शनिवारी रात्री हेगले नेटबॉल सेंटरमध्ये झाली. यामुळं वर्ल्डकपच्या सुरक्षेवर परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्यांनी एका स्थानिक वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीनं सांगितलं की, लॅपटॉपमध्ये कोणतीही खाजगी माहिती नाहीय आणि क्रिकेट वर्ल्डकप २०१५ची सुरक्षेबाबतही धोका नाहीय. ते पुढे म्हणाले, लॅपटॉपमध्ये अशी कोणतीही माहिती नव्हती ज्यामुळं टुर्नामेंटच्या सुरक्षेवर संकट होईल. त्यात पासवर्ड टाकले होते. 

वर्ल्डकपचं उद्घाटन उद्या क्रायस्टचर्चच्या नार्थ हेगले पार्कमध्ये होणार आहे. नोल्सनं सांगितलं की, पोलीस सुरक्षेच्या तयारीनं ते खूश आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.