मुंबई : हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये मैदानात झालेली भांडणं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या भांडणामधलेच काही किस्से हरभजननं सांगितले आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम एकसारखी मला डिवचत होती. तेव्हा मी वैतागून डॅरेन लेमनला तु गरोदर आहेस का असं विचारलं. त्याचं मोठं पोट बघून मीही त्याला डिवचायचा प्रयत्न केला असं हरभजन म्हणाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फक्त तेच सुपर स्टार आहेत, त्यांना कोणी हरवू शकत नाही असं वाटतं, पण मी अशा पिढीतून आलोय ज्याला कोणी रोखू शकत नाही, असं हरभजन म्हणाला आहे.
मी लेमनला ऐकवल्यानंतर त्यानं ही गोष्ट शेन वॉर्नला सांगितली. शेन वॉर्नही माझं उत्तर ऐकून पोट धरून हसायला लागला, असं हरभजन म्हणाला आहे.