हर्षा भोगलेंचं कमबॅक, हिंदीतून समालोचन करणार

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. याबरोबरच क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचा एक वर्षाचा वनवासही संपला आहे. य

Updated: Apr 5, 2017, 07:14 PM IST
हर्षा भोगलेंचं कमबॅक, हिंदीतून समालोचन करणार  title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. याबरोबरच क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचा एक वर्षाचा वनवासही संपला आहे. यंदाच्या मोसमामध्ये हर्षा भोगले हिंदी समालोचन करणार आहेत. खुद्द हर्षा भोगलेंनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

बीसीसीय आणि भारतीय खेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर मागच्या वर्षी हर्षा भोगलेंची कॉमेंट्री बॉक्समधून गच्छंती झाली होती. मागच्या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपवेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हर्षाचं नाव न घेता कॉमेंट्रीवर टीका केली होती. बिग बींचं हे ट्विट धोनीनं रिट्विट केलं होतं. विराट कोहली आणि मुरली विजय हेदेखील हर्षा भोगलेंनी विचारलेल्या प्रश्नावर नाराज झाल्याच्या चर्चा होत्या.

खेळाडूंची ही नाराजी लक्षात घेता टी-20 वर्ल्ड कपनंतर हर्षा भोगले कॉमेंट्री करताना दिसले नाहीत.