भारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 

Updated: Mar 9, 2016, 11:50 AM IST
भारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-पाकिस्तान सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

या सामन्यासाठी मोहाली अथवा बंगळुरुपेक्षा कोलकातामधील ईडन गार्डनला अधिक पसंती मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलेय. यापूर्वी पाकिस्तानच्या सुरक्षा पथकाने भारतात येऊन सुरक्षेबाबतचा आढावा घेतला. 

वेळापत्रकानुसार पाकिस्तानचा संघ बुधवारी भारतात येणार असता त्यानंतर १७ मार्चला धरमशालाकडे रवाना झाला असता. जर सामना पुढे ढकलण्यात आला तर पाकिस्तानचा संघ २० मार्चला भारतात दाखल होईल. त्यांचा २२ मार्चला सामना न्यूझीलंडशी होणार आहे.