कसोटी मालिकेत निर्भेळ यशासाठी भारत सज्ज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामन्याला आज चेन्नईतील चेपॉकच्या स्टेडियमवर सुरुवात होते. मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेतल्यानंतर या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यास भारतीय संघ सज्ज झालाय.

Updated: Dec 16, 2016, 08:07 AM IST
कसोटी मालिकेत निर्भेळ यशासाठी भारत सज्ज title=

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामन्याला आज चेन्नईतील चेपॉकच्या स्टेडियमवर सुरुवात होते. मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेतल्यानंतर या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यास भारतीय संघ सज्ज झालाय.

विराट कोहली अँड कंपनी या सामन्यातही विजय मिळवत इतिहास रचण्यास सज्ज झालीये. हा सामना जिंकल्य़ास सलग 18 सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम कर्णधार कोहलीच्या नावे असेल. 

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. मुंबईच्या स्टेडियमवर कोहलीची जबरदस्त झंझावात पाहायला मिळाला. या कसोटीत त्याने द्विशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

त्यामुळे चेन्नईच्या या सामन्यातही कोहलीकडून याच कामगिरीची अपेक्षा आहे. कोहलीसह आर. अश्विन तसेच रवींद्र जडेजाच्या फिरकीची जादूही चेपॉक स्टेडियमवर चालेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.